आपला जिल्हा

देवदूतांच्या अंगात सैतान घूसला, जिल्हाधिकार्‍यांचा आदेश फाट्यावर मारून व्यापारी झोडपून काढला

काळ्या इंग्रजांची राजवट असल्याचा अनुभव घेतला बीडकरांनी

बीडनेहमीच्या सवयी प्रमाणे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मध्यरात्री सुधारित आदेश काढले. या आदेशाला फाट्यावर मारत रामप्रहरीच वासुदेवाच्या अंगात सैतान संचारला अन त्यांनी सुभाष रोड वरील व्यापारी व ग्राहकांना दुकानात घुसून मारहाण करण्यास सुरुवात केली.या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बैठक बोलावली असून यापुढे दुकाने उघडी ठेवायची किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी साहेब आपण मध्यरात्री काढत असलेले आदेश प्रशासनाला माहित होत नाहीत तर जनतेला कसे माहिती होणार. एकंदरच लहरी राजा प्रजा आंधळी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नेहमीच्या सवयी प्रमाणे बुधवारी पहाटे 2. 32 च्या सुमारास सुधारित आदेश काढले. या आदेशानुसार सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत व्यापारी प्रतिष्ठान ( काही वगळून) उघडे ठेवण्याची परवानगी दिली. मात्र जुन्या आणि नव्या आदेशानुसार व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली असता साडेसातच्या सुमारास बीड शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वासुदेव मोरे व त्यांच्या टीमने सुभाष रोडवरील व्यापाऱ्यांच्या दुकानात घुसून व्यापारी व ग्राहकांना बेदम मारहाण केली. दुकान बंद करायला लावून त्यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण केले.सुभाष रोडवरील पायल साडी सेंटर,परिधान ड्रेसेस,आकाश इलेक्ट्रॉनिक या दुकानासह बहुतांश दुकानदारांना दमदाटी केली. मारहाणी बरोबरच त्यांना पोलीस ठाण्यातही घेऊन जाण्यात आले. पोलिसांनी ठाण्यात सुद्धा व्यापाऱ्यांची असभ्य वर्तन केले. नंगानाच केल्यानंतर वासुदेव मोरे यांना उशिरा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश माहीत झाला त्यानंतर त्यांनी सारवासारव करण्यासाठी आम्हाला आदेश माहीत नव्हता जिल्हाधिकाऱ्यांनी उशीर आदेश काढल्यामुळे हा प्रकार घडला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत अशी अनाउन्समेंट केली. प्रश्न हा निर्माण होतो की िल्हाधिकार्‍यांचा आदेश माहिती नव्हता तरी पूर्वीच्या आदेशाप्रमाणे सात ते साडे नऊ या वेळेत दुकाने उघडी ठेवण्यात परवानगी होती मग सकाळी साडेसात वाजता हा नंगानाच करण्याची मोरेंना गरज काय पडली? दरम्यान या घटनेमुळे व्यापारीवर्ग संतप्त झाला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत या मुजोर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे त्याबरोबरच बैठक घेऊन यापुढे दुकान चालू ठेवायचा किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या महा मारीत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना देवदूताची उपमा दिली जात आहे मात्र प्रशासन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा दुरुपयोग करीत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close