क्राईम

घात वार : पाटोदा मांजरसुंबा रोडवर भीषण अपघात; सहा ठार

नानासाहेब डिडूळ

पाटोदा — पाटोदा मांजरसुंभा रोड अहमदपूर अहमदनगर मार्गावर बामदळे वस्ती येथे टेम्पो – स्विफ्टचा अपघात झाला असून यामध्ये चौरे ( कुटे ) कुटुंबामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला . बामदळे वस्ती जवळ झालेल्या अपघातग्रस्त
स्विफ्ट डिजायर मधून चौरे ( कुटे ) परिवार लग्नासाठी केजकडे जात होता.
पाटोदा मांजरसुंबा रोडवरील बामदळे वस्तीवर आयशर टेम्पोचा ( क्र . एम . एच . २६ बी . ई .५ ९ ४५ ) अपघात झाला . टेम्पो व डिवायडरच्यामध्ये कार अडकलेली होती . कारमधील लहान मुलासह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला . पुणे येथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी जीवाचीवाडी ( ता . केज ) येथे जात असताना पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे सकाळी सातच्या दरम्यान मांजरसुंबाच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पो व पुणे येथून येणाऱ्या स्विफ्ट कारचा अपघात झाला . यामध्ये जिवाचीवाडी येथील रामहरी चिंतामणी कुटे ( ४० ) त्यांच्या पत्नी सुनिता रामहरी कुटे ( ३५ ) मुलगा ऋषिकेश रामहरी कुटे , आकाश रामहरी कुटे , मुलगी प्रियंका रामहरी कुटे , राधिका सुग्रीव केदार यांचा जागीच मृत्यू झाला . अपघात इतका भीषण होता की , आयशर टेम्पो व डिवायडरमध्ये स्विफ्ट कार घुसल्याने स्विफ्ट कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली . घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस हजर झाले होते . सर्वांनी मिळून मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button