कृषीवार्ता

बीड तालुका दूध संघाला 40 हजार लिटर दूध पुरवठा करण्यास मंजुरी- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीडबीड तालुक्यात दूध व्यवसाय हाच शेतकऱ्यांसाठी उदरनिर्वाहाचे साधन आहे सातत्याने शेतीमधील उत्पादनावर कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच परिणाम होत आला आहे शेती आता शाश्‍वत उत्पन्न देत नाही म्हणून शेतकरी दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वळला आहे सर्व शेतकऱ्यांचे दूध शासनाद्वारे संकलित नाही केल्यास शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो यासाठी वेळ तालुका दूध संघात पूर्वीप्रमाणेच पन्नास हजार लिटर दुधाचा कोठा वाढवून देण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली होती त्यानुसार बीड तालुका दूध संघाला 40 हजार लिटर पुरवठा करण्यात मंजुरी दिली असल्याची माहिती माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे

राज्यात लोक डाऊन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी सहकारी संस्थांचे दूध शासन योजने अंतर्गत खरेदी केले जात आहे लॉक डाऊन च्या काळात निर्माण झालेल्या अतिरिक्त दुधाचे नियोजन करून त्यापासून दूध भुकटी आणि बटर बनवण्यासाठी राज्यात दहा लक्ष लिटर दूध स्वीकारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे बीड तालुका दूध संघात दूध संकलन 1991 पासून सुरू आहे सध्या 75 ते 80 हजार लिटर दूध संकलन होत असून त्या पैकी 35 हजार लिटर दूध महानंद मुंबई येथे पुरवठा केले जात होते व 45 ते 50 हजार लिटर दुध शासकीय दूध योजने अंतर्गत स्वीकारले जात होते परंतु अचानक महा संघाने व शासनाने दूध कोठा कमी करून प्रत्येकी फक्त 20 हजार लिटरलाच मंजुरी दिली त्यामुळे संघाकडे शेतकर्यांचे 40 ते 45 हजार लिटर दुध अतिरिक्त होऊ लागले हे दूध संघास विक्रीसाठी अडचण येऊ लागल्याने माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे पाठपुरावा करून 40 हजार लिटर दुध पुरवठा करण्यास मंजुरी मिळवली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close