महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय–घरपोच मिळणार दारू

मुंबईराज्यातील मद्य शौकिनांना सरकारने मोठा दिलासा दिला असून 14 मे पासून घरपोच दारू देण्यात येणार आहे. काही अटी व शर्ती वर दारू विक्रीला परवानगी देण्यात येत आहे.
राज्य सरकारने काही दिवसापूर्वी वाईन बियरची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र तळीरामांनी दुकानासमोर मोठी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले होते. परिणामी पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ लागला होता. त्यामुळे मद्य विक्रीच्या दुकान खुली ठेवण्यास विरोध होऊ लागला होता. मात्र आता राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागानं मोठा निर्णय घेतला असून 14 तारखेपासून घरपोच दारू देण्यात येणार आहे. यासाठी काही अटी व शर्ती ठेवण्यात आले आहे जसे की कंटेनमेंट झोन वगळता. सर्वत्र होम डिलिव्हरी देण्यात येणार आहे. दारूच्या दुकानातुन डिलिव्हरी देणारा डिलिव्हरी बॉय फिट आहे का याची तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला घरपोच दारू देण्याची परवानगी देण्यात येणार आहे. जे दुकान मालक उत्पादन शुल्क विभागाला संपर्क करतील त्यांना ही परवानगी देण्यात येणार आहे. याबरोबरच डिलिव्हरी बॉय ला विभागाकडून ओळखपत्र सुद्धा देण्यात येणार आहे. ज्याच्याजवळ हे ओळखपत्र आहे. त्यांनाच दारू पोहोच करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close