आरोग्य व शिक्षण

🇮🇳पीएचडी साठी विद्यापीठाने आडमुठी भूमिका घेतल्याने चार विद्यार्थ्यी बसले उपोषणाला🇮🇳

विद्यापीठ प्रशासन म्हणाले उपोषण कराल तर याद राख..!

गेवराई — डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी साठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने आडमुठे धोरण ठेवल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले असून, जो पर्यंत प्रतिक्षा यादी जाहीर करत नाहीत तोपर्यंत माघार नाही ,असा इशाराच दोन दिवसापासून विद्यापीठात उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांनी एका निवेदनात दिला आहे. दरम्यान, लोकशाही मार्गाने निवेदन देऊन उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाने धमकी वजा पत्र पाठवून, उपोषणास बसू नका. तुम्हाला तसा अधिकार नसल्याचे सांगण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने,पाली अँड बुद्धिझम विभागातील पी एच. डी. उर्वरित विद्यार्थ्याची प्रतीक्षा यादी लावली नाही. त्यामुळे, अनेक विद्यार्थी पात्र असून ही अडचणीत आलेत. त्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात ठेवून, विद्यापीठ प्रशासनाने आठमुठी भूमिका घेतली आहे. विद्यार्थी चकरा मारून थकलेत. त्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. तरीही, संबंधित विभाग झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष करीत असून, विद्यार्थ्यांकडून एक निवेदन कुलगुरू येवले यांना देण्यात आले आहे.

त्या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही सर्व विद्यार्थी गेल्या तीन ते चार महिन्यापासून पी.एचडी. प्रतीक्षा यादीची प्रतीक्षा करीत आहोत. यासाठी आम्ही वेळोवेळी अर्ज , विनंत्या आणि निवेदने देऊन त्रस्त झालो आहोत. तरीही, विद्यापीठ प्रशासनाने अद्यापही कोणताच निर्णय घेतलेला नाही. ज्यामुळे, आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अन्याय झालेले विद्यार्थी दि. ११ ऑगस्ट२०२२ पासून सुधा मोहिले, निता जाधव, सचिन गणकवार, गजानन लांडगे उपोषणास बसले आहेत. दोन दिवसापासून त्यांना विविध संघटनेकडून पाठिंबा मिळत असून, विद्यापीठ प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नाही. उलट त्यांना धमकी वजा नोटीस देऊन दबाव टाकला जात असल्याची चर्चा विद्यापीठ परीसरात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button