कृषी व व्यापार

🇮🇳 चौसाळ्याच मंडळ कृषी कार्यालय तीन वर्षापासून बंद; शेतकऱ्यांचा 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा 🇮🇳

बीड — चौसाळ्याच मंडळ कृषी कार्यालय गेल्या तीन वर्षापासून बंद असून कृषी योजनच्या अनुदानापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवलं जात आहे. तपासणीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी संपर्क साधला तर अरेरावीची भाषा कर्मचाऱ्यांकडून वापरली जात आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा तुकाराम विष्णुदास जोगदंड यांनी दिला आहे.
चौसाळा येथील मंडळ कृषी कार्यालय गेल्या तीन वर्षापासून बंद आहे. या कार्यालयात जवळपास 16 कर्मचारी काम करत असले तरी उंटावरून शेळ्या राखण्याचं काम ते करत आहेत. तीन वर्षाच्या कालावधीत एकही कर्मचारी कार्यालयाकडे फिरकलाही नाही. शासनाकडून मिळणारा पगार मात्र नियमित घेत असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचं जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तुकाराम जोगदंड यांनी म्हटला आहे.
शेतकरी बांधवांच्या प्रत्येक कामाकरिता त्यांना जिल्हयाच्या ठिकाणी फोनवर संपर्क साधुन देखील अरेरावीची उत्तरे देतात . गेल्या एक वर्षापासुन
शेतक-यांना कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या अनुदानापासुन वंचित ठेवण्याचे काम या कार्यालयामार्फत चालविले जाते . तपासणीच्या नावाखाली शेतकरी बांधवांकडुन पैसे उकळुन काम चालू आहे . पैसे न दिल्यास त्याचे प्रस्ताव रद्द करण्यात येतात .सध्या स्थितीत अनेक शेतक – यांना विविध योजनांचा लाभ घेऊन देखील त्यांचे अनुदान मागणी प्रस्ताव पैसे न दिल्यामुळे रद्द केलेले आहेत. असा आरोप देखील त्यांनी केला आहे .अनुदान पाहिजे असेल तर मांजरसुंबा येथील धाब्यावर बोलून पैसे घेतात . तरच पुढील कार्यवाही होईल असे सांगतात. येथील अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्यामुळे त्यांचा मासिक पगार हा बॉयोमॅट्रीक पद्धतीने प्रत्येकांची हजेरी घेऊन काढण्यात यावा. अन्यथा स्वातंत्र्य दिना दिवशी 15 ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयासमोर अथवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय चौसाळा येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा तुकाराम जोगदंड व शेतकऱ्यांनी दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button