कृषी व व्यापार

🇮🇳 चौसाळा: एस बी आयचे डांगे यांच्या नियतीत खोट; दाखवताहेत बीड कडे बोट 🇮🇳

चौसाळा — स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना शेतकऱ्यांची परवड होऊ लागली आहे. खरीप हंगाम अर्धा संपत आला तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. एसबीआयचे शाखाधिकारी राजेश डांगे हे बीडहूनच आपली फाईल मंजूर होऊन आली नाही असं म्हणत हात झटकत असल्याचं पाहायला मिळू लागल आहे.
गोगलगायीचा प्रादुर्भाव व पावसामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. हंगामात वेळेवर पैसा उपलब्ध झाला तर उत्पादन काढायला सोयीचे होईल म्हणून शेतकऱ्यांनी एसबीआय कडे पीक कर्जाची मागणी देखील केली. मात्र राजकारणी, सावकारांचं हित जोपासत रोजंदारी सफाई कामगाराच्या सल्ल्यावरून बँकेचा कारभार केला जात असल्या कारणाने खरीप हंगाम अर्धा संपत आला तरी पीक कर्जांना मंजुरी मिळत नसल्याची ओरड शेतकरी वर्गातून केली जात आहे. शाखाधिकारी राजेश डांगे हे तुमची फाईल मंजुरीसाठी बीडला गेली आहे ती मंजूर होऊन आली की कर्ज देता येईल असं म्हणत हात झटकून रिकामे होत आहेत. असं असलं तरी राजकारणी बाबूची शिफारस आली. सफाई कामगाराच्या मर्जीत एखादा शेतकरी उतरला तर मात्र त्या फाईलला मंजुरी मिळत असल्याचं दिसून येऊ लागला आहे. दोन दोन महिने झाले तरी शेतकरी बँकेचा उंबरठा झिजवत असून शेतकऱ्यास शाखाधिकार्‍याच्या व सफाई कामगाराच्या उत्तरानं निमुटपणे वापस फिरत सावकाराच्या दारात जावं लागत आहे. जवळपास 36 गाव या बँके कडे दत्तक असून देखील पीक कर्ज वाटपाकडे पाहिजे तितकं लक्ष दिल जात नसल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होऊ लागला आहे. शाखाधिकारी डांगे यांच्या विरोधात वरिष्ठांनी त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून न्याय द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button