क्राईम

🇮🇳 कंत्राटदाराने 3 कोटी घेतले, मात्र रो-हाऊस धारकांची केली फसवणूक..! 🇮🇳

गेवराई — तीन कोटी रुपयांची तुंबडीभर रक्कम घेऊन ही, कंत्राटदार मयुर जोजारे याने रो-हाऊस धारकांची चक्क फसवणूक केल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून, अपुरे कागदपत्र, अपुऱ्या सुविधांचा अभाव असलेल्या घरात घरमालकांचा जीव कासावीस होत आहे.

शहरातील ताकडगाव रस्त्याजवळ असलेल्या 19 रो-हाऊसला गळती लागली असून, पाठभिंतीला एक ही पिल्लर नाही. केवळ विटाची भिंत उभी करून विश्वासघात केल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून, संबंधित घरमालक कंत्राटदार मयुर जोजारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

गेवराई शहराजवळच्या ताकडगाव रोडवर डाव्या बाजूला कंत्राटदार मयुर जोजारे यांने नातेवाईकाच्या नावावर 19 रो-हाऊस ( घरे ) बांधून उभी केली होती. सदरील घराची जवळपास 15 लाख रू किंमत आकारून, 19 रो-हाऊसचा विक्री व्यवहार केला. त्या जागेवर 19 कुटुंबे राहत आहेत. या विक्री व्यवहारातून जवळपास 2 कोटी 85 लाखाची उलाढाल झालेली आहे. घर ताब्यात घेतल्यानंतर अनेक चुका घर मालकांच्या निदर्शनास आल्या. घराची शेवटची भिंत नुसतीच उभी केलेली आहे. त्या ठिकाणी बीम उभा करण्यात आलेला नाही. एका रो -हाऊसची भिंत तर दुसर्‍याच कंत्राटदाराच्या भिंतीला चिटकून जोजारे याने नवी शक्कल लढवून पराक्रम केला. मात्र, पहिल्याच पावसात पाणी आले आहे. घरापुढे ओपन पेस नाही. नाली बांधकाम करण्यात आलेले नाही. कायदेशीर प्रक्रिया न करताच कंत्राटदाराने रो-हाऊस विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे. घराचे अजून ही कामे अर्धवट आहेत. आपण फसलो, अशी भावना बळावली आहे. दरम्यान, 19 रो-हाऊसला गळती लागली असून, पाठभिंतीला एक ही पिल्लर (बीम) नाही. केवळ विटाची भिंत उभी केल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून, घरमालक कंत्राटदार मयुर जोजारे याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button