कृषी व व्यापार

चौसाळा एसबीआय चा कारभारच भ्रष्ट ! राजकारण्यांचा तो बाबू शेतकऱ्याचं कारटं !!

चौसाळा — सफाई कामगाराचा सल्ला, राजकारणी सेठ बाबूंची शिफारस यावरच चौसाळा एसबीआय शाखेचा कारभार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नागरी बँकांप्रमाणे राजकारणी शेठ व्यक्तीचा होणारा हस्तक्षेप पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यास अडचणीचा ठरू लागला आहे. परिणामी राजकारण्याचा तो बाबू शेतकऱ्याचं ते कारट असं म्हणत कारभार सुरू आहे

कधी नव्हे ते रोजंदारी सफाई कामगाराला चौसाळ्याच्या एसबीआय शाखेत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. हा सफाई कामगार बँकेतील प्रत्येक घडामोडीची इत्यंभूत माहिती राजकारणी व्यक्तीला देण्याचं काम करतो. यावर आपला कोण परका कोण? निवडणुकांमध्ये कोणापासून फायदा होणार? कोण आपल्याशी प्रामाणिक आहे? यावर विचार मंथन करून सदरील राजकारणी पीक कर्ज मागणी करणाऱ्या शेतकऱ्याची शिफारस करतो. त्याला अनुमोदन सफाई कामगार देतो.या दोघांनी शाखा व्यवस्थापकास सल्ला कसा दिला यावर शेतकऱ्यास पीक कर्ज मिळणार की नाही याचं भवितव्य ठरतं. खरीप हंगाम अर्धा संपत आला अनेक शेतकऱ्यांना गोगलगायी मुळे, अतिवृष्टीमुळे दुबार पेरणी करावी लागली. शेतकऱ्यांना खाजगी सावकारांचे कर्ज काढावे लागले. पण बँकेतून पीक कर्ज मिळूच शकले नाही. परिणामी शेतकऱ्यांची हालत दयनीय होऊन बसली आहे. खाजगी बँका ज्याप्रमाणे संचालक मंडळाच्या मनमर्जीने चालतात तशीच अवस्था एसबीआयची झाली आहे. मग या बँकेला राष्ट्रीयकृत तरी कसं म्हणायचं? रिझर्व बँकेचे नियंत्रण कितपत आहे हा देखील मोठा प्रश्न आहे. दुपारी दोनच्या सुमारास बँकेला एक तास कर्मचारी कुलूप ठोकून जेवनासाठी मधली सुट्टी घेतात. बापाची जागीर असल्यासारखं ग्राहकांना उर्मट सारखं बोलतात. या सर्व घटनांची माहिती असताना देखील वरिष्ठ अधिकारी बघ्याची भूमिका घेतात. वरिष्ठ अधिकारी रोजंदारी सफाई कामगाराचं देखील लांगुलचालन करतात. राजकारणी व्यक्तीला बँकेच्या कारभारात हस्तक्षेप करत त्यांच्या इच्छेनुसार कारभार चालतो कसा? राजकीय फायद्यासाठी बँकेचा वापर करण्याची मुभा कशी दिली जाते? प्यादं म्हणून शाखाधिकारी डांगे कुठपर्यंत कारभार करणार? मग बँकेवर जबाबदारी असलेल्या छत्तीस गावातील जनतेची अशीच वाट लावली जाणार का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव देश साजरा करत असताना ही परिस्थिती उद्भवली असेल तर जनतेचा भवितव्य आबादीत कसा राखल्या जाणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. बँकेच्या आजवरच्या इतिहासात एवढी दारुनावस्था पहिल्यांदाच सफाई कामगार व व्यवस्थापकामुळे निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करता रोजंदारी सफाई कामगाराची हकालपट्टी करून डांगे वर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button