क्राईम

विलगीकरण कक्षात जाऊन महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

अमरावतीराज्याचे महसुली उत्पादन वाढावे यासाठी सरकारने दारू विक्रीला परवानगी दिली आहे. परिणाम विलगीकरण केलेल्या महिलेला मद्यधुंद पोलीस पाटलांने शरीरसुखाची मागणी केली असल्याची घटना अमरावती जवळील वडगाव येथे घडली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्क येऊन इतर व्यक्तींना बाधा होऊ नये यासाठी विलगीकरण करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील वडगाव येथे विलगीकरण कक्षात काही जणांना ठेवण्यात आले आहे. गावचे पोलीस पाटील रंजीत गजबे याने विलगीकरण कक्षामध्ये जाऊन एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याबरोबर त्याने या कक्षात जाऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केली. आपण केलेली मागणी पूर्ण न केल्यास उपाशी ठेवण्यात येईल अशी धमकी सुद्धा देण्यात आली. शेवटी घाबरलेले आरडाओरडा करत विलगीकरण कक्षातून पळून जात चांदूर पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून चांदोरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पोलीस पाटलास अटक केली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close