महाराष्ट्र

शनिवारी खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत बीड शहरात भव्य तिरंगा रॅली

सर्वांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हा ; भाजप जिल्हाध्यक्ष — राजेंद्र मस्के 

बीड — स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.देशात सर्वत्र स्वातंत्र्याची पंचाहत्तरी मोठ्या उत्साहात साजरी होते आहे, यानिमित्त बीड शहरात देखील तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रॅलीत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

अमृत महोत्सवानिमित्त आयोजित तिरंगा रॅली बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे, शहरातील माळी वेस-धोंडीपुरा-बलभीम चौक-राजुरी वेस-छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे रॅली निघणार असून सामाजिक न्याय भवन,नगर रोड येथे समारोप होणार आहे. तत्पूर्वी भाजप कार्यालयाच्या प्रांगणात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तसेच ध्वजारोहण सोहळ्यानंतर ‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी उभारण्यात आलेल्या ध्वज विक्री स्टॉलचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती ही भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button