क्राईम

केज पोलिसांनी 37 लाख रुपयांचा गुटखा केला नष्ट

केज — बेकायदेशीररित्या विक्री होणार्‍या गुटख्याविरोधात केज पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेत गेल्या काही दिवसात 36 लाख 93 हजार 35 रुपयांचा गुटखा जप्त केला होता. तो न्यायालयाच्या आदेशानंतर आज जाळून नष्ट केला. या वेळी केज पोलिसांसह काही पंचांना घटनास्थळी बोलवण्यात आले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून केज पोलिसांकडून विविध ठिकाणी अवैधरित्या गुटखा विक्री करणार्‍यांविरोधात छापे मारले होते. 2021 पासून जुलै 2022 पर्यंत सहा छापे मारण्यात आले होते. यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आली होती. तब्बल 36 लाख 93 हजार 35 रुपयांचा मुद्देमाल जमा झालेला होता. अखेर न्यायाालयाच्या आदेशानंतर अन्न भेसळ प्रशासन अधिकारी गायकवाड, केज पोलीस व पंचांच्या समक्ष सदरचा गुटखा आज जाळून नष्ट करण्यात आला. या वेळी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button