राजकीय

अखेर मोदींचा पत्ता कट, विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा

मुंबईविधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार की नाही याला आता पूर्णविराम मिळाला असून विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. कॉंग्रेस एक जागा लढवणार असून राजकिशोर मोदी यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.महा विकास आघाडीची बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर आघाडीत बिघाडी होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या अडेलतट्टू भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. मात्र आज महा विकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर काँग्रेसने एकच उमेदवार देणार असल्याचे निश्चित केले. या चर्चेनंतर माध्यमांशी संवाद साधून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आता काँग्रेस तर्फे एकच उमेदवार देण्यात येणार असल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध पार पडणार आहे उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून नऊ जागेसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. या राजकीय नाट्यानंतर बीडचे राजकिशोर मोदी यांची उमेदवारी धोक्यात आली असून आणखी एक आमदार मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close