आपला जिल्हा

माझी विठाई माऊली,धनंजय मुंडेंचा मातृदिनानिमित्त ‘सेल्फी विथ आई’ कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक मातेलाही केले वंदन!

परळी  — जागतिक मातृ दिनाच्या निमित्ताने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या आईसोबतचा विशेष सेल्फी शेअर करत आईच्याच चरणी वैकुंठ व आईच आपला पांडुरंग असल्याचे म्हटले आहे.

 

त्याचबरोबर मातृदिनाच्या शुभेच्छांसह धनंजय मुंडे यांनी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या, आपल्या कर्तृत्वाने मातृत्वाची ढाल समाजासाठी निर्माण करणाऱ्या प्रत्येक मातेला वंदन केले आहे.

आज १० मे जागतिक मातृ दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘मला आईचा मास्क सह अन्य विषयी सतत धाक असतो, मी खबरदारी घेतोच, परंतु माझी आई सातत्याने कटाक्षाने लक्ष ठेऊन असते की तिचा मुलगा बाहेर पडताना मास्क लावतोय का;’ असे म्हणतच ना. मुंडेंनी आई साठी मुलं सतत लहानच असतात असेही आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

कोरोनाने पसरलेल्या दहशतीखाली गेली दोन अधिक महिने सर्व सण उत्सव सबंध देशात घरातूनच साजरे केले जात आहेत. धर्मस्थळे, तीर्थस्थळे बंद आहेत, अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांनी आईच्याच चरणी आपलं वैकुंठ असून आईच आपला पांडुरंग असल्याचे अत्यंत प्रेरक वक्तव्य ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

कोरोना विरुद्ध लढणाऱ्या वॉरिअर्स मध्ये डॉक्टर्ससह विविध विभागातील अधिकारी, नर्स, पोलीस, सफाई कामगार आदी सर्वच स्तरातील महिला आपले मातृत्वाचे कर्तव्य निभावत समाजाला मायेची ढाल तयार करत आहेत, मातृ दिनाच्या निमित्ताने या सर्व मातांना मी वंदन करतो, असेही ना. मुंडे यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close