गेवराई — गेवराई नगरपरिषदेच्या वतीने, नप कार्यालया समोरच्या शास्त्री चौकात सोमवार ता. 8 रोजी सकाळी अकरा वाजता “हर घर तिरंगा” विक्री स्टॉलचे उद्घाटन युवा नेते शिवराज पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
दि. 13 ते 15 ऑगस्ट रोजी, सलग तिन दिवस “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येणार असून, आजादी का अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्याची जोरदार तयारी नप प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. बचत गटाच्या माध्यमातून तिरंगा ध्वज माफक दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. 21 रु. घेऊन एक ध्वज नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. तिरंगा ध्वज विक्री स्टाॅल चे उद्घाटन सोमवारी पार पडले.
यावेळी नपच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी अंधारे मॅडम, नगराध्यक्ष सुशील भाऊ जवंजाळ , नगरसेवक आप्पासाहेब कानगुडे, भरत गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते बदियोद्दिन भाई, नपचे कार्यालयीन अधीक्षक तिडके, राघव वाव्हळ,नगरपरिषदचे कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.