क्राईम

2 कोटी 85 लाखाच्या 19 रो-हाऊसला लागली गळती; कंत्राटदार मयुर जोजारेचा उघडकीस आला घोटाळा

गेवराई — शहरातील ताकडगाव रस्त्याजवळ असलेल्या 19 रो-हाऊसला गळती लागली असून, पाठभिंतीला एक ही पिल्लर (बीम) उभा केला नाही. केवळ विटाची भिंत उभी करून विश्वासघात केल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून, कंत्राटदार मयुर जोजारे यांचा घोटाळेबाज चेहरा बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, रो-हाऊस धारक तक्रार करणार असल्याची कुणकुण लागताच, घरे दुरुस्तीची घाई केली जात असल्याची चर्चा आहे.

गेवराई शहराजवळच्या ताकडगाव रोडवर डाव्या बाजूला कंत्राटदार मयुर जोजारे यांने नातेवाईकाच्या नावावर 19 रो-हाऊस ( घरे ) बांधून उभी केली होती. सदरील घराची जवळपास 15 लाख रू किंमत होती. 19 रो-हाऊसचा विक्री व्यवहार पूर्ण झालेला असून, त्या जागेवर 19 कुटुंबे राहत आहेत. या विक्री व्यवहारातून जवळपास 2 कोटी 85 लाखाची उलाढाल झालेली आहे. दरम्यान, घर ताब्यात घेतल्यानंतर अनेक चुका घर मालकांच्या निदर्शनास आल्या. घराची शेवटची भिंत नुसतीच उभी केलेली आहे. त्या ठिकाणी भीम उभा करण्यात आलेला नाही. एका रो -हाऊसची भिंत तर दुसर्‍याच कंत्राटदाराच्या भिंतीला चिटकून दिल्याचे लक्षात आले. काहींच्या भिंती मधून पहिल्याच पावसात पाणी आले आहे. मयुर जोजारे चक्क फसवणूक करून स्वतःची तुंबडी भरून घेतली असून, तो मोकळा झाला आहे. स्वतची हक्काची घरे घेऊन आनंदी असलेली 19 कुटुंबे थोड्याच दिवसात अडचणीत आली आहेत. घराच्या पाठी मागची भिंत पोकळ असल्याचे लक्षात आले. भिंती मधून पाणी आल्याने सर्व भिंती फुगल्या आहेत. अजून ही कामे अर्धवट आहेत. आपण फसलो, अशी भावना बळावत आहे. खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण झालेला असल्याने मयुर जोजारे याने मी तो नव्हेच, अशी भूमिका घेतली होती. परतू, तुम्ही भिंत आणि अन्य समस्या दूर करणार नसाल तर तुमची तक्रार करू, अशी भूमिका रहिवाशांकडून घेण्या आली. त्यामुळे, घाबरून जाऊन जोजारे याने थातूरमातूर कामे सुरूवात केली आहे. दरम्यान, 19 रो-हाऊसला गळती लागली असून, पाठभिंतीला एक ही पिल्लर (बीम) नाही. केवळ विटाची भिंत उभी केल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून, कंत्राटदार मयुर जोजारे यांचा घोटाळेबाज चेहरा बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button