महाराष्ट्र

एअरटेल कंपनी च्या खोदकामाचा रहदारीला फटका, नगर बीड हायवे वर वाहन फसू लागली

नानासाहेब डिडूळ

पाटोदा — तालुक्यातील चुंभळी फाटा येथे काही दिवसापूर्वीच नगर -बीङ हायवे लगतच एअरटेल कंपनीने केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले पण एअरटेल कंपनी ने सा.बांधकाम यांना विचारले का? विचारले तर रोङ लगत खोदाई करण्याची परवानगी कशी दिली ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांना मात्र याचा त्रास होऊन रस्ता चिखलमय झाला असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
एअरटेल कंपनी ने खोदकाम केल्यामुळे चुंभळी फाटा येथील व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर चिखल झाला आहे .खोदकाम केल्यामुळे झालेल्या चिखलात चार चाकी वाहन फसत असून रहदारीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे.तर आज तिरुपती यांचे सिमेंट चे मोठे कंटेनर हाॅटेल द्वारका समोर फसले कंटेनर काढण्यासाठी दोन JCB दोन क्रेन मागवण्यात आले सहा तासाच्या प्रयत्नानंतर चिखलात फसलेले कंटेनर काढण्यात यश आले क्रेन व JCB यांचा किरायाचा भुर्दंड कंटेनर चालकाला झाला.अगोदरच पैठण – पंढरपुर रोङ वरील चुंभळी फाटा येथील ङाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकाचे काम राजकारणी व गुत्तेदार यांच्या नाकर्तेपणामुळे अपुर्ण आहे तर त्यात हा एअरटेलने केलेले खोदकाम दुष्काळात तेरावा महिना ठरू लागले आहे.
एअरटेल कंपनी ने खोदकाम केल्यामुळे चुंभळी फाटा येथील व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर चिखल झाला आहे एअरटेल कंपनी वर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button