राजकीय

पंकजा मुंडे समर्थकांत संतापाची लाट; सोशल मिडीयावर गडकरी,फडणवीस,पाटलांची काढली जातीय खरडपट्टी

बीडकाल विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या नेत्याचे नाव नाकारण्यात आल्या नंतर मुंडे समर्थकात संतापाची लाट उसळलेली दिसून येत आहे.सोशल मीडियावर थेट भाजपाचे जेष्ठ नेते असलेले नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील,देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणे साधत त्यांची खरडपट्टी काढत आहेत.कार्यकर्ते मागचा पुढचा विचार न करता आपल्या मनातील आकस व्यक्त करत आहेत. काही ठीकानी तर थेट संघानेच हे केले असल्याचे बोलले जात आहे

काल दि.8 रोजी भाजपाने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमदेवारांची यादी जाहीर केली.या यादीमध्ये परळी मतदार संघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना संधी भेटणार असे बोलले जात होते मात्र तसे झाले नाही.ही बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी आपला आक्रोश सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करायला सुरुवात केला.काहींनी आपले राजीनामे दिले तर काहींनी थेट फडणीवस,गडकरी यांना नाही त्या शब्दांत लक्ष केले जात आहे.कालपासून समर्थकांनी आपले राजीनामा सत्रही सुरू केले आहे.केंद्राचे नाव पुढे करून राज्यातील जेष्ठ नेत्यांनीच हे टिकीट कापले असल्याचेही ते म्हणत आहेत.

एका व्हिडिओत बीड जिल्ह्यातील मुकुंद गर्जे या कार्यकर्त्यांने टरबूज काठीवर टांगून टरबूज्या नेच मुंडे यांचे तिकीट कापले असल्याचे म्हणले आहे.यामध्ये ज्या गोपीनाथ मुंडेंनी भाजपा वाढवला त्याच्याच लेकीला आज जाणीवपूर्वक डावलले जात असून,मोदींना चले जावं म्हणणाऱ्याला तिकीट दिले आहे.ज्या पंकजा
मुंडेंनी संघर्षयात्रा काढत 2014 साली भाजपाला सत्तेत बसवले होते त्याना बाजूला करून इतर पक्षातून आलेल्यांना संधी दिली जात असून दुर्दैव आहे असे म्हणत हा युवक त्या टरबुजाला जोड्याने मारत आपला संताप व्यक्त करतांना दिसत आहे.

महाजनादेश यात्रेदरम्यानही समर्थकांनी केले होते जेष्ठांना ट्रोल

आत्ताच पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झालेत असे नाही.याआधीही विधानसभा निवडणुकी दरम्यान देवेंद्र फडवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेने बीड जिल्ह्यात प्रवेश केल्यावर मुंडे यांना टाळत मेटे यांचा सत्कार स्वीकारल्याच्या कारणावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले होते.आता विधानपरिषदेचे तिकीट न दिल्याने संपूर्ण भाजपाला झोडपण्याचे काम मुंडे समर्थक करत असल्याचे दिसून येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close