परळी — तालुक्यातील ग्रामीण भागातील 18 गावे विद्युत रोहित्र (ट्रान्सफार्मर) बंद नादुरुस्त व जळाले असल्या कारणाने गेल्या 15 दिवसापासून अंधारात आहेत. महावितरणकडे अनेक गावातील ट्रान्सफार्मर जमा केलेले असताना देखील अधिकारी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत सबबी सांगत आहेत.
परळी तालुक्यातील 18 गावांमधील ट्रांसफार्मर जळाल्यामुळे अथवा ना दुरुस्त असल्याकारणाने गेल्या पंधरा दिवसापासून अंधारात चाचपडत बसावे लागत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रोजच्या खायच्या पिठाचा प्रश्न मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामस्थांनी ट्रान्सफॉर्मर महावितरणकडे स्वखर्चाने पोहोच केले मात्र अधिकारी रोहित्रचा तुटवडा व ऑइल नसल्यामुळे ट्रान्सफर उपलब्ध होत नाहीत अशा सबबी पूढे केल्या करत प्रश्नाला बगल दिली जात आहे.मलकापूर, नागापूर ही गाव गेल्या वीस पंचवीस दिवसापासून अंधारात आहेत.
महावितरण ने ग्रामीण भागातील नागरिकांना ट्रान्सफार्म देऊन अनेक गावातील अंधार दूर करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. महावितरणच्या या गलथान कारभाराविरोधात नागरिकात असून असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.स्थानिक नेत्यांसह लोकप्रतिनिधींना तीळमात्र गांभिर्य नाही. राजकीय वर्तुळात आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी परळीतील पुढाऱ्यांना ओळखले जाते. इतकंच नाही तर प्रशासकीय यंत्रणेवर वचक असलेले नेते म्हणूनही परिचित आहे. मात्र त्यांच्याच मतदारसंघात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कसलीच भीती नसल्याचे स्पष्ट दिसत असून या प्रकरणात लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.