आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मागील वर्षाची फी वसूल करण्याचा शिक्षण संस्था चालकांना सरकारचा परवाना

बाल हक्काचं काय? शैक्षणिक वर्ष पूर्ण झालं नसलं तरी फी द्यायचीच काय ?

मुंबईलाॅक डाऊन मुळे  अर्थ चक्राची गती थंडावली असल्यामुळे घर मालकांना मानवीय दृष्टिकोन समोर ठेवून घर भाडे वसूल करू नका जमले तर माफ करा असे सरकारकडून सांगितले जात असले तरी लॉक डाऊन संपल्यानंतर 2019 20 या शैक्षणिक वर्षाची फीस वसूल करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढत संस्थाचालकांचे हित जोपासण्याचे काम केले आहे.
कोरोना महामारीमूळे सर्व उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. अर्थ चक्राची गती थंडावल्या मुळे सर्वसामान्य जनतेची प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे. जीवन जगण्याचा संघर्ष सध्या पहावयास मिळत असताना मुलांच्या शैक्षणिक वर्षाचा व भविष्याचा विचार करणे अवघड होऊन बसले आहे. याच निर्माण झालेल्या कोंडी चा परिणाम मानवीय दृष्टिकोन समोर ठेवून घर मालकाने किंवा जागा मालकांने भाडे वसूल करू नये किंवा भाडे माफ करावे असे शासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. मात्र त्याच वेळी 2019 20 या कालावधीत शेवटच्या एक-दीड महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. शासनाला परीक्षाही रद्द कराव्या लागल्या. असे असताना संस्थाचालकांचे हित जोपासण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे. वरवर पाहता 2020- 21 या शैक्षणिक वर्षात फीस वाढ करू नये असे आदेश काढले असले तरी 2019 –20 या शैक्षणिक वर्षात पालकांना सवलत देऊन का होईना फी वसूल करावी असे असे निर्देश या अध्यादेशाद्वारे काढले आहेत.
सेवा क्षेत्राचा विचार केला तर पूर्ण सेवा दिली तरच त्याचा पूर्ण मोबदला देणे आवश्यक आहे. शैक्षणिक क्षेत्राचा विचार केला तर इथं सेवाच पूर्ण दिली गेली नाही तर मोबदला द्यायचा कसा आणि का असा प्रश्न निर्माण झाला आहे .एकीकडे सर्वसामान्य लोकांकडून मानवतेची अपेक्षा सरकार धरत आहे तर दुसरीकडे शिक्षणाच्या नावाखाली समाजाचे आर्थिक शोषण करणाऱ्या घटकाचे लांगुलचालन सरकार करत असल्याचे चित्र या अध्यादेशातून पाहायला मिळत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close