महाराष्ट्र

मुंबईमध्ये लष्कर येणार ही अफवा माझा प्रत्येक नागरिक सैनिक — उद्धव ठाकरे

मुंबई —  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. गेल्या अनेक दिवसांपासून अशी अफवा येत होती की मुंबईमध्ये लष्कर येणार. तर ही पूर्णपणे अफवा आहे. कारण माझा प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे, असा धीर त्यांनी यावेळी जनतेला दिला
सुरुवातीला त्यांनी कालच्या बैठकीवेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून सरकारच्या सोबत असल्याचे सांगितले.  इतर पक्षाच्या नेत्यांनी काही बाबी निदर्शनास आणून दिल्या. आणि सगळेजण एकत्र मिळून या कोरोनाशी लढत आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तसेच, आज औरंगाबाद येथे झालेल्या अपघातात ज्या मजुरांचा मृत्यू झाला त्या घटनेने मी व्यथीत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य सर्व मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. इतर राज्यांसोबत मजुरांच्या स्थलांतराबंतीत चर्चा सुरू आहे. आणखी ट्रेन सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे मजुरांनी कोठेही जाऊ नका, आहात तेथे सुरक्षित थांबा. राज्य सरकार तुम्हाला तुमच्या घरी पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्व मजुरांना दिले.

गेल्या अनेक दिवसांपासून अशी अफवा येत होती की मुंबईमध्ये लष्कर येणार. तर ही पूर्णपणे अफवा आहे. कारण माझा प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे, असा धीर त्यांनी यावेळी जनतेला दिला. तसेच, कोरोनाच्या या युद्धकाळात डॉक्टर, पोलीस तणावाखाली काम करत आहेत. काही पोलिसांना, डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे त्यांना देखील आरामाची गरज असल्याचे यावेळी मुख्मंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे मनुष्यबळ लागल्यास केंद्राकडून मागवू मात्र लष्कर मुंबईत येणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या लाईव्ह संवादातील महत्वाचे मुद्दे:

* सर्वपक्षीय बैठकीनंतर माझा आत्मविश्वास आणखी दुणावला
* राजकारण सोडून सगळे सरकारसोबत असल्याचे आश्वासन
* आज औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेमुळे मी प्रचंड व्यथित
* मजुरांनी अस्वस्थ होऊ नये, केंद्र-अन्य राज्यांसह चर्चा सुरु
* मुंबईत लष्कर येणार ही पूर्णपणे अफवा
* मला लष्कराची अजिबात गरज नाही, माझा प्रत्येक नागरिक सैनिक
* फक्त गरज पडल्यास लष्कर, रेल्वेची रुग्णालय वापरण्याचा विचार
* पोलिसांना विश्रांती देण्यासाठी अधिकच्या मनुष्यबळाची केंद्राकडे मागणी करू
* कोरोनाचा वेग रोखण्यात यश पण साखळी तोडण्यात अद्याप यश नाही.
* कोणत्याही रुग्णालयाचा गलथानपणा अजिबात चालणार नाही
* आयुष, होमिओपॅथी डॉक्टरांनाही सहभागी होण्याचे आवाहन
* लॉकडाऊनचे काय करायचे हे तुम्हीच ठरवायचे
* शिस्त बिघडवणे म्हणजे आपले संकट वाढवणे
* सोशल नव्हे तर फिझिकल डिस्टंसिंग पाळा

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close