क्राईम

चाइल्ड पॉर्नोग्राफी करणारा आरोपी पकडला

बीड- इंटरनेट कॅफे च्या माध्यमातून चाईल्ड पोर्नोग्राफी करणाऱ्या आरोपीला सायबर क्राईम शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . गेल्या महिनाभरात जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफी चे चार ते पाच गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली होती . शहरातील शिवाजीनगर पोलीस च्या हद्दीत मागील महिन्यात चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता . या प्रकरणाचा तपास करताना सायबर शाखेने संत नामदेव नगर भागात इंटरनेट कॅफे चालवणाऱ्या गोविंद बापूराव क्षीरसागर या व्यक्तीस अटक केली आहे . या आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . बीड जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफी चे चार ते पाच गुन्हे दाखल झाले होते . लहान मुलांचे व्हिडीओ इंटरनेट वर टाकून त्यांच्या पालकांची अन बालकांची बदनामी करण्याच्या या प्रकाराने खळबळ उडाली होती . गेल्या महिनाभरापासून पोलीस या प्रकरणात आरोपीचा शोध घेत होते .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button