आरोग्य व शिक्षण

कोरोनावर आयुर्वेदिक उपचार; आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली — कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी अश्वगंधा, यष्टीमधु, गुडुची, पिपळी, आयुष-६४ यासारख्या आयुर्वेदिक औषधांची उपयुक्तता तपासून पाहण्यात येत आहेत. करोना संसर्गाला रोखण्यासाठी किंवा प्रभावी उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाने आयसीएमआर आणि सीएसआयआर यांच्या तांत्रिक सहकार्याने वैद्यकीय प्रयोगाला गुरुवारपासून सुरुवात केली आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती दिली. आरोग्य कर्मचारी, करोना रुग्णांच्या संपर्कात आलेले किंवा करोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या लोकांवर या औषधांचे प्रयोग सुरू झाले आहेत. यानिमित्ताने आयुर्वेदिक औषधांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाशी लढण्यासाठी अश्वगंधाचा प्रयोग करण्यावर भर देण्यात येत आहे. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close