ताज्या घडामोडी

बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्ष पदी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांची नियुक्ती

बीड — बालकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारा एकमेव संघ बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्ष पदी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांची नियुक्ती संघाचे संस्थापक / प्रदेशाध्यक्ष हर्षल पटवारी यांच्या हस्ते संस्थापक सरचिटणीस प्रा. ज्ञानदेव इंगळे,संस्थापक उपाध्यक्ष डाॅ.भालचंद्र कदम यांच्या उपस्थितीत दि.२५ जुलै सोमवार रोजी बीड येथील शासकीय विश्रागृहात घेण्यात आलेल्या बीड शहर व जिल्हा पद नियुक्ति सोहळ्यात करण्यात आली.

बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य चा मुख्य उद्देश बालकांच्या अधिकाराच रक्षण करून बालकांचे बालपण वाचवण्यासाठी बाल स्नेही समाजाची निर्मिती करणे हा आहे. या अंतर्गत बाल कामगार, बाल भिक्षेकरू, विधी संघर्शित बालक, काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक यांच्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा संघाचा मानस आहे. बालकांसंबंधित विविध विषयांवर सरकार व अधिकाऱ्यांच लक्ष वेधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघ सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन हर्षल पटवारी यांनी केले.

बीड जिल्हा व तालुक्यांची कार्यकारणी जाहीर
बीड जिल्हा पदनियुक्ती कार्यक्रमात बीड जिल्ह्य़ातील पदाधिका-यांची कार्यकारीणी नियुक्ती पत्र देऊन जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत बीड जिल्हाध्यक्ष (शहरी)शेख युनूस च-हाटकर, बीड जिल्हाध्यक्ष (ग्रामीण )रहेमान सय्यद, बीड जिल्हाउपाध्यक्ष (ग्रामिण)संजय सानप, बीड बीड जिल्हाउपाध्यक्ष (शहरी)बलभीम उबाळे,जिल्हा सचिव (शहरी)सय्यद आबेद ,बीड जिल्हा सचिव (ग्रामिण)हमीदखान पठाण तर
बीड जिल्हा कार्याध्यक्ष पदी बालाजी जगतकर ,पाटोदा तालुकाध्यक्ष सतिश गर्जे,तर बीड तालुकाध्यक्ष पदी संभाजी भोसले यांची
नियुक्ती करण्यात आली.
नवनिर्वाचित प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी बाल हक्क संरक्षण संघाच्या मुख्य उद्दिष्टांसाठी सर्वांच्या सहकार्याने अहोरात्र परिश्रम करून पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वस्त करून आभार प्रदर्शन केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button