आरोग्य व शिक्षण

एस आर पी एफ च्या 72 जवानांसह 90 जणांना औरंगाबाद मध्ये कोरोनाची लागण

औरंगाबादऔरंगाबाद मध्ये 110 पैकी 72 एसआरपी जवानांसह इतर अठरा जणांचे अहवाल पॉझिटिव आल्यामुळे 90 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या 468 पर्यंत पोहोचली आहे

शहराजवळील सातारा परिसरात राज्य राखीव पोलीस दलाचा (एसआरपीएफ) कॅम्प आहे . या कॅम्पमधील जवान कोरोना चा हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव शहरात बंदोबस्तासाठी गेलेले होते. तसेच काही दिवसांपूर्वी याच कॅम्पमधील एका जवानास कोरोनाची बाधा झालेली आहे. मालेगाव येथून परतल्यावर या 72 जवानांच्या लाळेचे नमुने काल तपासणी साठी घेण्यात आले होते. आज शुक्रवारी या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील आज सकाळी आढळून आले कोरोनाबाधित रुग्ण हे एसआरपीएफ कॅम्प (72) जयभीम नगर (4), बेगमपुरा (4), भीमनगर, भावसिंगपुरा (1), शाह बाजार (01), ध्यान नगर, गारखेडा (01), लघुवेतन कॉलनी, मुकुंदवाडी (1), बायजीपुरा (3), कटकट गेट (1), सिकंदर पार्क (1) आहेत. तर ग्रामीण भागातील खुलताबाद (1) येथील आहेत. यामध्ये 83 पुरूष आणि 7 महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close