राजकीय

पेठ बीड भागात आसाराम भाऊ गायकवाड यांच्या रूपाने योगेश पर्वाला मोठी ताकद 

बीड –बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक आसाराम भाऊ गायकवाड यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत योगेश पर्व बरोबर राहणार असल्याने पेठ बीड भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे.

यावेळी आसाराम भाऊ गायकवाड यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबत काम करत असताना विकास कामे पूर्ण न झाल्यामुळे आपण विकास कामांना प्राधान्य देणाऱ्या नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असून पुन्हा एकदा जोमाने काम करणार असून येणाऱ्या काळात बीड नगर पालिका पुन्हा एकदा ताब्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, आसाराम भाऊ गायकवाड आपल्या बरोबर येत आहेत म्हणजे पुनर्रगृह प्रवेश होणार आहे.आसाराम भाऊ गायकवाड यांच्यामुळे पेठ बीड भागात ताकद वाढली आहे. पेठ बीड भागाने स्व.काकू नानांच्या काळापासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देखील आम्हाला मदत केली आहे. आसाराम गायकवाड यांना विरोधकांसोबत काम करत असताना वाईट अनुभव आल्यामुळेच त्यांनी पुनर्रगृह प्रवेश केला आहे.

डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर म्हणाले की, आसाराम भाऊ गायकवाड यांच्या रूपाने
पेठ बीड भागात मोठी ताकद आमच्या सोबत आली आहे. आसाराम भाऊ गायकवाड यांनी विकास कामांच्या मुद्यावर आमच्याकडे प्रवेश केला असल्याने त्यांना नक्कीच याची प्रचिती येईल. ग्रामीण भागात आणि बीड शहरात येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.पुढील काही दिवसात माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आसाराम भाऊ गायकवाड यांचा भव्य प्रवेश सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे देखील डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांनी सांगितले.

यावेळी बाजार समिती सभापती दिनकरराव कदम, तालुका दूध संघाचे अध्यक्ष विलास बडगे, अरुण डाके,ऍड राजेंद्र राऊत अमर नाईकवाडे, फारुख पटेल, बाळासाहेब गुंजाळ, सतिश पवार, प्रेम चांदणे, महेश धांडे,विकास जोगदंड, भास्करराव जाधव, किशोर पिंगळे, विलास विधाते, इकबालन शेख, भैय्या मोरे, गणेश वाघमारे, रंजित बनसोडे, शुभम धूत, राणा चौव्हान, सय्यद इलियास, मुन्ना इनामदार, रवींद्र कदम, सादेक शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button