देश विदेश

औरंगाबाद जवळ रेल्वे रुळावर झोपलेल्या मजुरांना मालगाडी ने चिरडले 17 ठार ,2 गंभीर जखमी

औरंगाबाद — -रेल्वेरुळावर झोपलेल्या 17 मजुरांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला तर दोन मधुर गंभीररित्या जखमी झाले आहेत ही घटना करमाड जवळील सटाणा शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ शुक्रवार दिनांक आठ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. लाॅक डाऊन मुळे मध्यप्रदेश कडे जाणारे हे मजूर होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल औरंगाबाद ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली

जालना एमआयडीसीतील एस आर जी स्टील कंपनीत मध्यप्रदेशातील काही मजूर काम करत होते. सध्या देशात लोक डाऊन सुरू असल्यामुळे जालना येथे अडकलेले हे मजूर आपल्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे सोडली तर जाता येईल यासाठी प्रयत्न करत होते. मोजक्याच रेल्वेस्थानकावरून अडकलेल्या मजुरांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत रस्त्याने गेले तर पोलीस विचारपूस करतील हा विचार करत त्यांनी रेल्वे रुळावरुन पाई प्रवासाला सुरुवात केली शुक्रवारी भुसावळ रेल्वे स्थानकावरून मध्यप्रदेशकडे श्रमिक रेल्वे गाडी सोडण्यात येणार असल्याचे या मजुरांना कळाले होते.  त्यामुळे काल रात्रीच या स्टील कंपनीतील हे १९ मजुर औरंगाबादमार्गे रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी रेल्वे रूळांवरून पायीच निघाले होते. मात्र रात्र झाल्याने ते थकून गेले. त्यांनी चक्क रेल्वे रूळांवरच काही काळ विश्रांती घेण्याचा विचार अंगलट आला. हे सर्व १९ मजूर साखरझोपेत असताना एका मालगाडीने त्यांना चिरडले. या घटनेत १९ पैकी १७ मजूर जागीच गतप्राण झाले . हे सर्व मजूर ३० ते ४० या वयोगटातील होते. या घटनेत कोणतीही महिला किंवा बालके या मजुरासोबत नव्हती, असे पोलीसांनी स्पष्ट केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close