आरोग्य व शिक्षण

जिल्ह्यात आरटीई अंतर्गत १ हजार ६३६ विद्यार्थ्यांना मिळाले इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश

१९४ विद्यार्थी आणखी प्रवेश मिळण्याच्या प्रतीक्षेत - मनोज जाधव

बीड —  दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत विनाअनुदानित शाळा मध्ये प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. बीड जिल्ह्यात निकष पात्र २२७ शाळा मध्ये १ हजार ९०८ जागा उपलब्ध होत्या या जागांवर आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावे यासाठी ४ हजार ९५२ इतके अर्ज पालकांनी ऑनलाईन पद्धतीने दाखल केले होते. त्या पैकी १ हजार ८३० पात्र विद्यार्थ्यांची निवड मोफत प्रवेशासाठी करण्यात आली होती. त्या पैकी १ हजार ६३६ विद्यार्थ्यांना आता मोफत प्रवेश मिळाला आहे. तर १९४ विद्यार्थी आणखी प्रवेश मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे.

आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादीतील चौथा टप्पा प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आला असून २२ ते २७ जुलै दरम्यान या टप्प्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रतीक्षा यादीतील पुढील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेशाची संधी मिळावी , यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे . आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये आतापर्यंत जिल्हा भारातून १ हजार ६३६ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित केले आहेत . चौथ्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीतील प्रवेशांमुळे या संख्येत भर पडून अधिक गरजू व दुर्बल घटकांतील गोर – गरीब विद्यार्थी या प्रक्रियेतून शिक्षण घेऊ शकतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे .या विद्यार्थ्यांनी २७ जुलैपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी समिती कडे जाऊन प्रवेशनिश्चिती करण्याचे आवाहन मनोज जाधव यांच्या कडून करण्यात आले आहे .

अशी झाली प्रवेश प्रक्रिया

मूळ निवड यादीतील मिळालेले प्रवेश – १३३७
पहिल्या प्रतीक्षा यादीत मिळालेले प्रवेश – २१५
दुसऱ्या प्रतीक्षा यादीत मिळालेले प्रवेश – ६८
तिसऱ्या प्रतीक्षा यादीत मिळालेले प्रवेश – १६
प्रतीक्षा यादीतील चौथा टप्पा घोषित करण्यात आला आहे.

तालुके. प्रवेशा मिळालेले
विद्यार्थी

अंबाजोगाई २७९
आष्टी ३९
बीड १४२
धारूर ८८
गेवराई २५२
केज १२८
माजलगाव १२५
परळी २४०
पाटोदा १८
शिरूर ४१
वडवणी ४५
बीड शहर २३९
एकूण १६३६

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button