चौसाळा — येथील जुने व एकनिष्ठ जेष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख होती चळवळी मध्ये ज्याचे बालाघाटवर योगदान होते अनेक आंदोलनात ज्यांनी महत्वाची भूमीका बजावली असे चौसाळा येथील ज्येष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते चंद्रकांत नाना देशमुख यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे उपचार घेत असताना आज सकाळी सात वाजून 30 मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चौसाळा परिसरात शोककळा पसरली आहे
त्यांचा अंत्यविधी चौसाळा येथील शेतात दुपारी दोन वाजता होणार आहे. देशमुख कुटुंबियांच्या दुःखात ” सह्याद्री माझा ” परिवार सहभागी आहे