क्राईम

पाटोदा पोलिसांनी 35 लाखांचा गुटख्याचा कंटेनर पकडला

पंकज कुमावत यांच्या माहीती वरुन कारवाई...

नानासाहेब डिडूळ

पाटोदा — बिदरहून पुण्याकडे गूटखा घेऊन जाणारा कंटेनर पाटोद्याचे पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर यांच्या टीमने पकडला. याची सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त माहिती मिळाली होती त्यांनी तात्काळ पाटोदा पोलिसांशी संपर्क करून कारवाई करण्याची सूचना केली होती या कारवाईत 35 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

कर्नाटकातील बिदरहून पुण्याकडे आयशर कंटेनर मधून गुटखा नेला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. हा कंटेनर पाटोदा तालुक्यातून जात असून तात्काळ कारवाई करण्याची सूचना त्यांनी पाटोदा पोलिसांना केली. या मिळालेल्या सूचनेवरून पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर , पो ना मदन क्षीरसागर यांच्या टिमने बीड- अहमदनगर महामार्गावरील चुंबळी फाटा परिसरातील येवलवाडी फाट्यावर गुटखा घेऊन जाणारा आयशर कंटनेर क्र. एम.एच.14 जीडी – 3150 आडवला चालक संतोष संभाजी नागरगोजे रा.लातूर यास ताब्यात घेत कंटेनरची तपासणी केली असता यामध्ये गोवा गुटख्याचे 35 पोते आढळून आले. कंटनेर व गुटखा माल असा एकूण 35 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पो.ह.बालाजी दराडे,मदन क्षीरसागर,डोके यांचा सहभाग होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button