महाराष्ट्र

औरंगाबाद मध्ये 28 रुग्णांची वाढ, आतापर्यंत 349 कोरोनाबाधित

औरंगाबादलॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये रात्रभरातच २8 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील बाधितांची संख्या ३49 झाल्याने आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

चार रुग्ण हे नव्या विभागातील आहेत. त्यामुळे हे चारही नवे विभाग सील करण्यात येत असून या ठिकाणची टेस्टिंग वाढवण्यात येणार आहे. नव्या परिसरात सापडलेल्या करोनाबाधितांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात येणार असून त्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात येत आहे. तसेच बाधितांचे शेजारी आणि त्यांच्या संपर्कातील लोकांचीही तपासणी करण्यात येणार असून त्यांनाही क्वॉरंटाइन करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 
शहरातील विविध भागातील एकूण 27 आणि ग्रामीण भागातील एक कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 349 झाले आहेत. कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) जयभीम नगर (05), कबाडीपुरा (05), दत्त नगर-कैलास नगर (04), बायजीपुरा (04), संजय नगर, मुकुंदवाडी (03), पुंडलिक नगर (03), बेगमपुरा (01), रेल्वे स्टेशन परिसर (01), कबीर नगर, उस्मानपुरा, सातारा रोड (01) या परिसरातील आहेत. तर ग्रामीण भागातील इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर, एमआयडीसी येथील एका महिला रुग्णांचा समावेश आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close