आरोग्य व शिक्षण

दिंद्रुड येथे पोलिसांची केली आरोग्य तपासणी

दिंद्रुडमाजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशन च्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली असुन प्राथमिक आरोग्य केंद्र भोगलवाडी ची वैद्यकीय टीम याप्रसंगी उपस्थित होती.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून संचार बंदी लागू आहे या काळात पोलिसांवर वाढलेला ताणतणाव व सतत असलेला जनसंपर्क यामुळे पोलिस विभाग कोरोना प्रादुर्भावाचा शिकार होत आहे. केवळ महाराष्ट्रात ४५३ पोलिसांना कर्तव्य निभावताना कोरोना प्रादुभावाची लागण झाली आहे.६९ वाडीवस्तीची हद्द असलेल्या दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये ३३ पोलिसांचा स्टाफ आहे. कर्तव्य निभावताना अहोरात्र नोकरीची व्यस्तता व कामामुळे आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनि अनिल गव्हाणकर यांनी दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी फिवर स्क्रीनिंग, रक्तदाब, शुगर आदी बाबींवर पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. आरोग्यवर्धक औषधींचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र भोगलवाडी चे वैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती लगड, डाॅ दिलीप वाघचौरे, परिचारिका ए ए मस्के, लॅब टेक्नीशियन विजय पवार, इंगोले आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close