ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार नागनाथ जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने  निधन

बीड — साप्ताहिक लोक जगतचे संपादक, दैनिक लोकपत्रचे बीड जिल्हा प्रतिनिधी, दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे बीड जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ जाधव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवार दिनांक 12 जुलै 2022 रोजी मध्यरात्री दरम्यान दुःखद निधन झाले. ते नांदेड जिल्ह्यातील जाकापूर तालुका कंधार येथील मूळ रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12.30 (साडेबारा) वाजता भगवान बाबा प्रतिष्ठान जवळील वैकुंठधाम स्मशानभूमी बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ संपादक, पत्रकार नागनाथ जाधव यांचे काही दिवसापूर्वी छातीत दुखू लागल्याने एन्जोप्लास्टी सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर ते व्यवस्थित होऊन कार्यरत झाले होते. मात्र तेव्हापासून तब्येत साथ देत नव्हती. काही दिवसांपूर्वी ताप आली होती. डॉक्टरांनी कावीळ झाल्याचे निदान केले होते, मात्र त्यातून ते सावरले होते. काल मंगळवार दिनांक 12 जुलै रोजी ते दैनिक लोकसत्ता कार्यालयात नेहमीप्रमाणे आले. सर्व कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारी केल्या. सर्वांशी हसून खेळून बोलून ते नेहमीप्रमाणे दुपारी घरी गेले. दिवसभर पाऊस असल्याने ते दुपारनंतर घरीच थांबले. सायंकाळी जेवण करून झोपी गेले. रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांना अचानक छाती त्रास होऊ लागला. वेदना असह्य झाल्या, घरीच उलटी देखील झाली. दरम्यान त्यांना कुटुंबीयांनी तात्काळ दीप हॉस्पिटल येथे दाखल केले.डॉक्टरांनी उपचार सुरू केले मात्र त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणजोत मालवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी सुभद्रा नागनाथ जाधव ,मोठी मुलगी सौ वर्षा दीपक डावकर, दुसरी मुलगी सौ महानंदा चेतन इंगोले आणि सर्वात लहान मुलगी मानसी नागनाथ जाधव असे कुटुंब असून त्यांच्या पश्चात आई श्रीमती चौत्राबाई वेंकटराव जाधव, मोठी बहीण ममता गोपाळराव हंबर्डे, सौ मंगलबाई धोंडगे, सौ राणीबाई श्रीनिवास जाधव, तसेच लहान भाऊ विलास, प्रकाश आणि गोपाळ व्यंकटराव जाधव असा मोठा परिवार आहे. जाधव कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात “सह्याद्री माझा ” परिवार सहभागी आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button