राजकीय

जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत रद्द

बीड — ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हापरिषद , पंचायत समित्यांसाठीची आरक्षण सोडत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे .
जिल्हापरिषद , पंचायत समित्यांसाठी उद्या दि . 13 जूलै रोजीची आरक्षण सोडत आता पुढे ढकलण्यात आली आहे . यामुळे ओबीसी प्रवर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे . राज्यातील जिल्हापरिषद , पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत रद्द करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज दिले . सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची याचिका सुरु असून त्यात 19 जुलै ला पुढील सुनावणी असल्याचं सांगत आयोगाने आरक्षण सोडत पुढे ढकलली आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button