ताज्या घडामोडी
चौसाळा : ग्राहकांची अडवणूक; जूनी 50 ची नोट घेण्यास एसबीआय बॅंकेचा नकार

चौसाळा — जुन्या पन्नास रुपयांच्या नोटा चलनातून अद्यापही बाद झाल्या नाहीत मात्र एसबीआयच्या चौसाळा शाखेकडून या नोटा स्वीकारल्या जात नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. एकंदरच रिझर्व बँकेच्या नियमाची ऐशी तैशी करण्याच्या नादात ग्राहकांची मात्र कूचंबना होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
हिच ती 50 रूपयांची नोट आहे जी घेण्यास नकार दिला.
दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान मधली सुट्टी घेण्याचा नियम रिझर्व बँकेने रद्द केला तरी देखील चौसाळा शाखेत ग्राहकांना बाहेर हाकलून देत दूपारी बँकेला कुलूप ठोकण्याच काम केलं जातं.
सोबतच जुन्या फाटक्या नोटा कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये स्वीकाराव्यात असे आदेश बँकेला आहेत. मात्र जुन्या पन्नास रुपयाच्या नोटा धडक्या असल्या तरी ग्राहकाच्या तोंडावर फेकून मारण्याचं काम एसबीआय शाखेचा कॅशियर खामकर करत असल्याचा अनुभव ग्राहकांना येऊ लागला आहे. सोबतच तो स्थानिकचा असल्यामुळे अरेरावी ची भाषा करत ग्राहकांना धमकावण्याचं काम देखील करत असल्याचं पाहायला अनुभवायला मिळत. भाषेतला उर्मटपणा ग्राहकाला बँकेत येऊन मूर्खपणा केला की काय ? असा पश्चाताप करायला लावणारा आहे.