आपला जिल्हा

विविध राज्यात, जिल्ह्यात समूहाने अडकलेले विस्थापित व्यक्तींना बीड जिल्ह्यात येण्यासाठी आदेश पारित

बीडजिल्ह्यात राज्यांतर्गत, परराज्यातून समुहामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी जिल्ह्यात येण्यास परवानगी बाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

राज्यांतर्गत, परराज्यातून बीड जिल्ह्यात। समूहाने येणाऱ्या व्यक्तींची संबंधित नोडल अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त होणारी यादी, जोडपत्र ‘ब” (Annexure B) मधील परवानगी, वैद्यकीय प्रमाणपत्र, रूट प्लॅन, बाहनाची परवानगी, वाहनाचे प्रकार, प्रवासाचा कालावधी इत्यादी पत्रासह माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हा नियंत्रण कक्षाने निवासी उपजिल्हाधिकारी यांचे संबंधितांना परवानगीचे पत्र पाठवावे व अशी प्राप्त यादी संबंधित तहसीलदार यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवावी.
वरील परवानगी नंतर समूहाने येणारे व्यक्तींची चेकपोस्टवरती (ऊसतोड कामगारांसाठी विहीत केलेल्या कार्यपद्धती प्रमाणेच) वैद्यकीय तपासणीसह इतर कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल. चेकपोस्टवरील वैद्यकीय पथकामार्फत आलेल्या प्रत्येक व्यक्तींची थर्मल गनद्वारे व इतर अनुषंगिक तपासणी करून आवश्यकतेनूसार होम कोरनटाईन किंवा Institutional Quarantine करण्याची कार्यवाही तालुका आरोग्य अधिकारी
यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे सल्ल्याने करावी.ज्या व्यक्तींना होम कोरनटाईन करण्यात आले आहे अशा व्यक्तींची पुढील 28दिवसासाठी शहरीभागात महानगरपालिका, नगरपालिका,
नगरपंचायत हे पाहतील ग्रामिण भागात संबंधित ग्रामसेवक हे पाहतील.
या व्यक्ती संबंधित गावी पोहोचल्यानंतर (ऊसतोड कामगार गांवी पोहोचल्यानंतर करावयाच्या कार्यपद्धती) दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल.
या आदेशाची अवाज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता 1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेसपात्र अपराध केला असे मानण्यात येईल आणि दिवाणी व फोजदारी कार्यवाही करण्यात येईल.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close