ताज्या घडामोडी

चौसाळ्याचा शाखा व्यवस्थापक डांगे आरबीआयच्या नियमांना उलटा टांगे

बीड — चौसाळ्याच्या एसबीआय शाखेत व्यवस्थापकाच्या मनमानी कारभारामुळे आरबीआयच्या नियमांना टांग मारली जात आहे डांगे च्या टांग मारू कारभाराने सर्वसामान्य ग्राहक मात्र पिळवटून निघत आहे. अशा कारभाराला पायबंद घालावा अशी मागणी होऊ लागली आहे.
रिझर्व बँकेच्या नियमांच्या आईचा घो असं म्हणत शाखा व्यवस्थापक राजेश डांगे यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. दुपारी दोन ते तीनच्या सुमारास मधली एक तासाची सुट्टी घेत जेवण सोबतच थोडीशी विश्रांती घेऊन नंतरच बँकेच्या कामकाजाला सुरुवात होते. या बँकेच्याकडे तब्बल 35 गाव दत्तक आहेत. दुसरी राष्ट्रीयकृत बँक चौसाळ्यात उपलब्ध नसल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची दारो मदार या बँके वरच आहे. मात्र लहरी व्यवस्थापकाच्या कारभारामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दुपारची जेवणाची सुट्टी रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे घेता येत नाही मात्र जनतेच्या अडलेल्या कामाशी कर्मचाऱ्यांना काही देणे घेणे नाही. शिवाय मिळत असलेल्या भरमसाठ पगाराचा माज गोरगरीब आवर काढण्याचा प्रयत्न सर्रास केला जातो बँकेत पैसे ठेवून अडकलेला शेतकऱ्याला अरेरावीची भाषा करत बँक बापाची असल्याचा आव आणला जात आहे. हे जनतेचे नोकर कि जनता यांचे नोकर हाच मोठा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणाला पायबंद घातला जावा अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. डांगे च्या या कारभाराला आळा घातला जाईल काय? गोरगरिबांना व्यवस्थित वागणूक मिळेल काय? मोदींच्या सबका साथ सबका विकास या ब्रीद वाक्यावर बँकेचा कारभार चालणार काय? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button