देश विदेश

एकाच व्यक्तीवर दोन वेगवेगळ्या देशात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली –राजस्थान मधील एका व्यक्तीचा कूवैत मध्ये कोरोना मुळे मृत्यू झाला. मात्र सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्याचा मृतदेह भारतात आणणे शक्य झाले नाही. परिणामी कुवेत प्रशासनाने त्याचा दफनविधी केला. तर राजस्थानमधील त्याच्या कुटुंबीयांनी प्रतिकात्मक पुतळा तयार करत हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले
राजस्थान मधील डूंगरपुर इथल्या सीमलवाडा मध्ये राहणारी एक व्यक्ती बऱ्याच वर्षापासून येथे व्यवसायानिमित्त राहत होती. हॉटेल व्यावसायिक असलेल्या या व्यक्तीला कुवेत मध्येच कोरोना ची लागण झाली. बरेच दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र या आजारात त्यांचा मृत्यू झाला. कोरोना झाल्यामुळे त्यांचा मृतदेह भारतात पाठवणे अशक्य झाल्यामुळे कुवेत प्रशासनाने त्यांचा तेथेच दफनविधी केला. मात्र हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले नाही याचे दुःख राजस्थान मधील त्यांच्या कुटुंबियांना वाटत होते. शेवटी त्यांनी पुतळा तयार करून पुतळ्याला त्यांचे जुने कपडे घालून अंत्ययात्रा काढली व स्मशानभूमीत त्यांच्यावर अग्निडाग देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close