क्राईम

अवैध गर्भपात प्रकरणातील मूख्य आरोपी डाॅक्टर पकडला

 बीड- अवैध गर्भपात प्रकरणातील मूख्य आरोपी डॉ . सतीश सोनवणेला( रा. जाधववाडी, औरंगाबाद) अखेर स्थानिक गून्हे शाखेने अहमदनगर येथून अटक केली अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे . सतीश सोनवणे हा वैद्यकीय शिक्षण घेत होता

    शीतल गाडे वय 30 वर्ष , रा . बकरवाडी , ता . बीड या महिलेचा अवैध गर्भपातादरम्यान 5 जून रोजी मृत्यू झाला . या प्रकरणात पिंपळनेचे उपनिरीक्षक एम . एन . ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पती गणेश सुंदरराव गाडे , सासरा सुंदरराव बाबुराव , दोघे रा . बकरवाडी , ता . बीड , भाऊ नारायण अशोक निंबाळकर रा . शृंगारवाडी , ता . माजलगाव , अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप रा . अर्धमसला , ता . गेवराई , प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके रा . आदर्शनगर , बीड , सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला . त्यातील सीमा हिने पाली येथील तलावात आत्महत्या केली . इतर पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मनीषा कारागृहात आहे , तर इतरांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . ््् ्

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button