बीड — पेठ बीड पोलिस ठाण्यात शूक्रवारी संध्याकाळच्या सुमारास एका मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यांने धिंगाना घालत दुसऱ्या वरिष्ठ कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. अशा मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारून यंत्रणेला शिस्त लावण्याचं आव्हान नवीन आलेल्या पोलिस अधीक्षकां समोर आहे.
शुक्रवारी उबाळे नामक कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत पेठ बीड पोलिस ठाण्यात संध्याकाळच्या सुमारास आला मात्र हजेरी पटावर गैरहजेरी ची नोंद पाहताच प्रचंड भडकला त्याने ठाण्यात च धिंगाणा घालण्यास सुरूवात केली.एका वरिष्ठ कर्मचाऱ्यास तर शिव्यांची लाखोळी वहात धक्का बुक्की करण्यास सुरुवात केली.हा धिंगाणा जवळपास एक तास सूरु होता. सध्या हा वरिष्ठ कर्मचारी देखील उबाळे च्या दहशतीखाली काम करत आहे. यापूर्वी याच कर्मचाऱ्याने एक वर्षापासून बजाज कंपनीची मोटारसायकलला एम.एच.23 ए.डी.0923 क्रमांकाची नंबर प्लेट बसवून वापरत होता.मात्र या क्रमांकाची पासिंग चारचाकी गाडीची होती. मग ही मोटार सायकल चोरीची होती की एखाद्या गंभीर गून्हात आरोपीने वापरलेली होती ?असा प्रश्न ‘सह्याद्री माझा ‘ने उपस्थित केला होता.मात्र वरिष्ठांनी या प्रकरणी उबाळे वर कारवाई न करता त्याला पाठीशी घातले. परिणामी उबाळे चे मनोबल वाढले असून आता पोलीस कर्मचार्याचीच तो डोकेदूखी बनू लागला आहे.मग जनतेशी तो कसा वागत असेल याची कल्पना न केलेलीच बरी ! या प्रकरणाची नवे पोलीस अधिक्षक नंदकूमार ठाकूर गंभीर दखल घेऊन उबाळे वर कडक कारवाई करत पोलिस यंत्रणेला शिस्त लावण्याचं काम करतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.