आपला जिल्हा

बीड बायपास मावेजा वाटपात गैरव्यवहार प्रकरणी कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. District Collector orders action in Beed Bypass Maveja allotment fraud case

बीड — बायपास मावेजा वाटपात अंदाजे १०० कोटी गैरव्यवहार प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल संबधित उपजिल्हाधिकारी भु-संपादन जा. प्र. बीड, उपविभागीय आधिकारी बीड, तहसिलदार बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन बीड बायपास मावेजा वाटपात गैरव्यवहार प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत नितिनजी गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दि.१७ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी बीड यांना बीड जिल्हाप्,शासनाकडुन केंद्र सरकारची दिशाभूल करून बीड बायपास मावेजा वाटपात अंदाजे १०० कोटी रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला असून यात भु-संपादन विभाग जि.का.बीड, तहसिल कार्यालय, भुमिअभिलेख कार्यालय, नगर रचनाकार कार्यालय मधिल आधिकारी-कर्मचा-यांनी संगनमताने राष्ट्रीय महामार्ग २११ साठी केलेल्या भु-संपादन बाबत उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी १७ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते.
त्या अनुषंगानेच जिल्हाधिकारी कार्यालय (समन्वय विभाग)बीड यांनी दि.०२ सप्टेंबर २०२१ रोजी पत्रक क्रमांक २०२१/जीबी/डेस्क-२/भु-सं/समन्वय/ई-३७८९१ नुसार
उपजिल्हाधिकारी भु-संपादन जा.प्र बीड, उपविभागीय आधिकारी बीड, तहसिलदार बीड यांना निवेदनात नमुद करण्यात आलेल्या मुद्याच्या अनुषंगानेच नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारास कळवुन आंदोलनापासुन परावृत्त करण्याबाबत आदेश देऊन सुद्धा वरील प्रकरणात कोणतीही कारवाई न करता जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच निवेदनात बीड बायपास मावेजा वाटपात गैरव्यवहार प्रकरणात नमुद मुद्यांबाबत उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत
अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close