महाराष्ट्र

ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदल, या दोन नावांची भर पडण्याची शक्यता? Thackeray cabinet reshuffle, possibility of adding these two names?

मुंबई — मागील काही दिवसांपासून ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पावसाळी अधिवेशनानंतर देखील कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.
अशातच आता हिवाळी अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे.

या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात काँग्रेसमधून दोन नेत्यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे आता एका काॅबिनेट मंत्र्याला आणि एका राज्यमंत्र्याला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर परवानगीसाठी नाना पटोले दिल्लीला रवाना झाले आहेत.
मंत्रिमंडळाच्या या दोन पदांसाठी खुद्द नाना पटोले यांचं नाव समोर येत आहे. तर सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांच्या नावावर देखील आज किंवा उद्या शिक्कामोर्तब होऊ शकतं.दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ती जागा अद्याप रिक्तच आहे. अशातच आता नाना पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यावर आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close