आपला जिल्हा

बायोडिझेल साठ्यावर पोलिसांचा छापा साढे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त Police raid on biodiesel stock and seize goods worth Rs 10.5 lakh

अंबाजोगाई — बेकायदेशीर बायोडिझेल चा साठा एका शेतात केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे. पोलिस उपअधीक्षक सुनील जायभाये यांनी केलेल्या कारवाईत कातकरवाडी शिवारातून बेकायदेशीर बायोडिझेल, टेम्पो व टँकर असा एकूण 10 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आली असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी बर्दापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कातकरवाडी शिवारात फुलचंद कातकडे यांच्या शेतात डिझेल सदृश्य केमिकल विक्रीसाठी साठा करून ठेवले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे बर्दापूर पोलीस ठाण्याचे स.पो नि. अशोक खरात, पोलीस कर्मचारी सतीश कांगणे, आतकरे, सपकाळ यांनी केलेल्या कारवाईत एक टेम्पो एमएच 26 एडी 7480 व त्यामध्ये 700 लिटर इंधन तसेच टँकर एमएच 24 जे 5999 ज्यामध्ये 3 हजार 100 लिटर इंधन असा एकूण 10 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.यावेळी बबन बाजगीरे रा. अहमदपूर लातूर, रामकिसन मुंडे रा. दगडवाडी, ता. अहमदपूर आणि माधव बालाजी जायभाये रा.कातकरवाडी, ता. अंबाजोगाई या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले‌. यावेळी एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सतिश कांगणे यांच्या फिर्यादीवरुन बर्दापूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close