आपला जिल्हा

महाराष्ट्र अस्थिरोग तज्ञ संघटनेच्या उपाध्यक्षपदी डॉ. प्रमोद शिंदे यांची निवड As the Vice President of Maharashtra Orthopedic Association, Dr. Selection of Pramod Shinde

बीड —  महाराष्ट्र अस्थिरोग तज्ञ संघटनेच्या निवडणुकीमध्ये बीड येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रमोद शिंदे हे राज्य उपाध्यक्षपदी विजयी झाले आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी तीन उमेदवार होते. झालेल्या एकूण मतदानापैकी साठ टक्के मते घेऊन दोनशे मताच्या आघाडीने राज्य उपाध्यक्षपदी डॉ प्रमोद शिंदे विजयी झाले . ऑनलाइन पद्धतीने अत्यंत पारदर्शक झालेल्या निवडणुकीत राज्यभरातील अस्थिरोग तज्ञ यांनी मतदानात सहभाग नोंदवला.


डॉ.प्रमोद शिंदे यांनी राज्य संघटनेच्या कार्यकारणी सदस्य म्हणून तीन वर्ष काम केले आहे. डॉ. प्रमोद शिंदे हे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात सतत आघाडीवर असतात. ते सध्या बीड आय एम ए चे उपाध्यक्ष व बीड अस्थीरोग संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी बीडमध्ये आत्तापर्यंत अस्थिरोग तज्ञ विभागीय परिषदा व अनेक सी एम इ यांचे आयोजन केले आहे. बीड सारख्या छोट्या जिल्ह्यांमधून राज्यपातळीवर उपाध्यक्षपदी विजयी झाल्यामुळे त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. बीड अस्थीरोग संघटनेचे डॉक्टर टी एल देशमुख, डॉक्टर धायतडक, डॉक्टर भोरे, डॉक्टर विठ्ठल क्षीरसागर, डॉक्टर अंशुमन बहिर, डॉक्टर आनंद वैद्य, डॉक्टर एस एल आ ळ ने, डॉक्टर प्रशांत सानप, डॉक्टर विश्वास गवते आणि सर्व अस्थिरोग तज्ञ, आय एम ए बीड चे अध्यक्ष डॉक्टर अनुराग पांगरीकर, डॉक्टर हिरवे, डॉक्टर अनिल बारकुल, डॉक्टर पिके कुलकर्णी, डॉक्टर सीए गायकवाड, डॉक्टर केडी पाखरे आणि सर्व आयएम ए सदस्य सर्वांनी अभिनंदन केले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close