क्राईम

गेवराईत डी. बी.पथकाची पुन्हा मोठी कारवाई 9 मोटारसायकलसह दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या The big operation of DB squad caught two accused with 9 motorcycles

 गेवराई — तालुक्यातील अनेक दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असून या मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळत या टोळीकडून नऊ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई डी बी पथकाचे प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्या टीमने केली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेवराई शहरासह तालुक्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते याला आळा बसावा यासाठी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी
यांनी प्रत्येक ठाण्यात डी. बी.पथकाची स्थापन करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये गेवराई पोलीस ठाण्यात या पथकाची जबाबदारी सपोनि प्रफुल्ल साबळे यांना देण्यात आली. दरम्यान या पथकाची नेमणूक केल्यापासून आतापर्यंत त्यांनी अनेक गुंन्हे उघड केले असून मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन टोळ्या, विद्युत मोटार पंप चोरणाऱ्या टोळी आशा अनेक आरोपींच्या मुसक्या अवळल्याने तालुक्यात त्यांचा वचक निर्माण झाल्याने चोरीच्या घटनांना आळा बसत आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात विद्युत पंप चोरीच्या मोठया कारवाई नंतर काल पुन्हा नऊ मोटारसायकलसह आरोपी
संतोष बबन यादव(वय 29)वर्ष रा.दुरगुडपट पिंपरी पेंढार (ता.जुन्नर)व निखिल रंगनाथ घाडगे (वय 26)वर्ष रा. कांदळी वडगाव (ता.जुन्नर जि. पुणे) या मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपीना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून नऊ मोटारसायकल जप्त करत गेवराई पोलीस ठाण्यात गुरनं 445/2021 कलम 379 भा. द.वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डीवायएसपी स्वप्नील राठोड व पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख प्रफुल्ल साबळे, जमादार विठ्ठल देशमुख, कृष्णा जायभाये, पो.ना.शरद बहिरवाळ, नारायण खटाने यांनी केली आसून अधिक तपास सुरू आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close