क्राईम

पिठाच्या पोत्यातून गुटखा घेऊन जाणारा टेम्पो महारटाकळी चेकपोस्टवर पकडला

चकलांबानाशीक कडे जाणाऱ्या टॅम्पोची महारटाकळीच्या चेक पोस्टवर तपासणी केली असता या टेम्पो मध्ये पिठाच्या पोत्यांमध्ये ठेवलेला गुटखा असल्याचे निदर्शनास आले.या कारवाईत पोलिसांनी 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ‌


‌. सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर तंबाखूजन्य पदार्थ विक्री व खाण्यास सरकारने प्रतिबंधीत केले आहेत. मात्र आजही चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक चा परवाना घेतलेला टेम्पो पीठ व तांदूळ घेऊन जात असताना
चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महारटाकळी चेक पोस्टवर तपासला गेला. हा टेम्पो हैदराबाद वरून नाशिक कडे जात होता. एके 01–5851 नंबरच्या आयशर टेम्पोची तपासणी केली असता पिठाचा पोत्यातून गुटखा भरून घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. गुडख्यासह टेम्पो 35 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला
याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्याच्यावर चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close