आरोग्य व शिक्षण

भीमरत्न करंडक राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन , सहभाग नोंदवण्याचे आवाहन. Bhimaratna Trophy State Level Open Eloquence Competition, Appeal for Registration

गेवराई  —  भारतीय संविधान दिनानिमीत्त मॅा.संतोषी अर्बन व संस्कृती प्रतिष्ठाण,गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने येथिल ‘सहारा बालग्राम’ येथे ‘भीमरत्न करंडक’ राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ शुक्रवार रोजी आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये इच्छूकांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक संजय भालशंकर, माधव चाटे , राहुल गिरी यांनी केले आहे.

सदरील वक्तृत्व स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असून स्पर्धकांना भाषणासाठी पुढील सहा विषयांपैकी एका विषयाची निवड करता येणार आहे; ज्यामध्ये प्रत्येक स्पर्धकाला भाषणासाठी सात मिनीटांचा वेळ देण्यात येणार आहे.  चिरंतन युगमुद्रा डॅा.बाबासाहेब आंबेडकर,संत वाड्ग्मयाची सामाजिक फलश्रुती, महात्मा फुले व डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक अनुबंध, कोरोना:आगामी आव्हाने ?, महाराष्ट्राच्या जडणघडणीत अल्पसंख्याकांची भूमीका व अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना हे स्पर्धेचे विषय आहेत.

सदरील स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा स्पर्धेच्या दिवशीच स्पर्धा संपन्न झाल्यानंतर सायंकाळी ५:०० वा. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणा-या स्पर्धकास रू.११ हजार व आकर्षक भीमरत्न करंडक तर द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणा-या स्पर्धकास प्रत्येकी रू. ७ हजार व रू.५ हजार आणि आकर्षक सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे तर अनुक्रमे चौथा,पाचवा व सहावा क्रमांक प्राप्त करणा-या स्पर्धकास प्रत्येकी रू.१ हजार व आकर्षक सन्मानचिन्ह या स्वरूपातिल  कै.विश्वनाथ खंडागळे स्मृती पारितोषिक, स्व.बब्बुभाई बारूदवाले स्मृती पारितोषीक व स्व आदित्य कुलकर्णी स्मृती पारितोषिक देवून गौरविण्यात येईल आणि अनुक्रमे सातवा व आठवा क्रमांक प्राप्त स्पर्धकास रू. ५०० व आकर्षक सन्माचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणा-या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

अतिशय भव्य अशा या ‘भीमरत्न करंडक’ खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये राज्यभरातिल इच्छुकांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संजय भालशंकर,माधव चाटे व राहुल गिरी यांच्यासह स्पर्धेच्या संयोजन समीतीचे सदस्य विनोद सौंदरमल, भागवत जाधव, शैलेश जाजू, आण्णासाहेब राठोड, सुभाष सुतार, उद्धव मडके, किशोर सोनवणे, सुनील मुंडे, संतोष सुतार, पंकज पाटेकर, प्रा.आर.आर. उगले व प्रा.नरेश घुंगरड यांसह आदींनी केले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close