आपला जिल्हा

मोठेपणा न करता थेट रस्त्याच्या कामाला सुरुवात ,नेत्रधाम परिसरातील मुख्य रस्त्याची नगराध्यक्षांनी केली पाहणी The mayor inspected the main road in the Netradham area

बीड — शहरातील नेत्रधाम परिसरातील स्वा सावरकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करावे ही मागणी केली जात होती दोन दिवसांपूर्वीच नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर या भागात जिमच्या शुभारंभ साठी आले होते,तेथे रस्त्याच्या कामाची मागणी केली होती कुठलाही मोठेपणा न

 करता आज सोमवारी थेट कामालाच सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

बीड शहरातील नेत्रधाम परिसरातील स्वा सावरकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम होणे महत्त्वाचे होते अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांनी यासाठी पाठपुरावा केला होता तसेच सावरकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी आणि संस्थाचालकांनी ही मागणी केली होती शनिवारी महाविद्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी रस्त्याचे काम देखील करण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिले होते आज सोमवारी अचानक जेसीबी, रोड रोलर खडीचा ट्रक आणि मजूर या भागात येऊन धडकल्या आणि थेट कामाला सुरुवात करण्यात आली अचानक पणे सुरु झालेल्या या कामामुळे नागरिकही अचंबित झाले होते तेव्हा एका नागरिकाने थेट अध्यक्ष साहेबांना फोन केला तेव्हा डॉ क्षीरसागर यांनी येऊन कामाची पाहणी केली यावेळी नगरसेवक बाबुराव दुधाळ,प्रा लक्ष्मीकांत बाहेगव्हांनकर,प्राचार्य पांगारकर,किशोर चव्हाण,पत्रकार प्रशांत सुलाखे,रत्नपारखी काका,भालचंद्र देशमुख,शर्मा काका,शिवाजीराव कदम,देवानंद पागोटे,चंदन महाजन, महाविद्यालयातील कर्मचारी वृंद तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते मुख्य रस्त्यालगत नालीचे काम करून भविष्यात हाच रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा करण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले आहे

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close