राजकीय

पिंपळगाव मजरा ता. बीड सेवा सोसायटी आ. संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात !

चेअरमन पदी मोहन खांडे उपाध्यक्षपदी हरिराम खांडे बिनविरोध

आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांचे स्वीय सहाय्यक माणिक खांडे यांच्यावर गावकऱ्यांनी टाकला विश्वास

 

बीड — आज बीड तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी पिंपळगाव मजराची सेवा सोटायटी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली,त्यानंतर चेरमनपदी मोहन खांडे यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपद निवडीत हरिराम खांडे यांनी 13 पैकी 9 मते घेऊन विजय मिळवला. गेल्या अनेक वर्षांपासून या सेवा सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम असून सरपंच काशीनाथ आणा खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुन्हा ही सेवा सोसायटी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या ताब्यात आली आहे. गावकऱ्यांनी एकमुखाने आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांचे स्वीय सहायक माणिक खांडे यांचे वडील मोहन खांडे यांची संचालक पदी व नंतर चेरमनपदी बिनविरोध निवड करून पूर्ण विश्वास टाकला आहे.

पिंपळगाव मजरा ता .बीड सेवा सोसायटीच्या 13 जागांसाठी निवडणूक झाली. यात श्री नारायण डुकरे हे सुरुवातीलाच बिनविरोध झाले.त्यांनंतर अटीतटीची निवडणूक होत असताना सर्वानुमते माणिक खांडे यांचे वडील मोहन खांडे यांच्या नावर चेरमन पदासाठी एकमत होऊन शेवटच्या क्षणी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. दि.10 जून रोजी चेरमन पदाची निवड प्रक्रिया डी डी आर ऑफिस मध्ये पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिटकर, जाधव साहेब यांनी काम पाहिले. या बिनविरोध संचालक मंडळात श्री हरिराम खांडे, श्री मोहन खांडे, श्री नारायण डुकरे, श्री गोविंद खांडे, श्री बंडू राऊत, शांताबाई सखाराम पडघम, कांताबाई रामराम खांडे यांचा समावेश आहे. गावचे सरपंच श्री काशिनाथ आणा खांडे, उपसरपंच श्री राजूसेठ खांडे, जेष्ठ मार्गदर्शक श्री गणपत आबा खांडे,श्री पंडित खांडे, नवनाथ आणा खांडे,श्री पुष्पल नाना खांडे,श्री अनिल खांडे, श्री रमेश पडघम,श्री हरीचंद्र खांडे, श्री संदीपन दादा खांडे, श्री श्रीकृष्ण खांडे, श्री सखाराम खांडे,श्री बालनाथ खांडे आदींनी निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळाचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.

आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी केले अभिनंदन

पिंपळगाव मजरा ता. बीड सेवा सोसायटीतील सर्व संचालक आणि नुतूनचेरमन मोहन खांडे, व्हाएस चेरमन हरिराम खांडे, सरपंच काशीनाथ आणा खांडे यांचे आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी अभिनंदन केले असून उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी सर्वांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.

उपाध्यक्ष निवडीत 13 पैकी मिळाले 9मते
मोहन खांडे यांची चेरमन पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. यावेळी हरिराम खांडे यांना 13 पैकी 9 मते मिळाली आणि त्यांची पुन्हा व्हाईस चेरमन पदी निवड झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button