महाराष्ट्र

मराठवाडयात नोव्हेंबरमध्ये 15 दिवसात  14 हजार शेतक—यांकडून 7 कोटी 51 लाख रूपयांचा विज बिल भरणा In Marathwada, electricity bill of Rs. 7 crore 51 lakhs was paid by 14 thousand farmers in 15 days in November

कृषीपंपांची दोन चालू बिले भरल्यास रोहित्र बदलून मिळणार

”आपले रोहित्र, आपली जबाबदारी स्विकारावी”

औरंगाबाद —   बळीराजासाठी  कृषीपंपांची वीज बिले भरण्यासाठी चालू दोन वीज बिले भरल्यास नादुरूस्त अथवा जळालेले रोहित्र बदलून देण्याचा महावितरणने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मराठवाडयातील औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलात नोव्हेंबरमध्ये 15 दिवसात 14 हजार शेतक—यांकडून 7 कोटी 51 लाख रूपयांचा भरणा करून महावितरणच्या धोरणात्मक निर्णयाला उदंड प्रतिसाद दिला आहे.  दोन चालू कृषीपंप वीज भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

     ”नादुरूस्त रोहित्र दुरूस्तीसाठी  पैसे  लागतात”
कृषीपंप रोहित्र नादुरूस्त अथवा जळाल्यास ते दुरूस्त करण्यासाठी आॅईल व इतर साम्रग्रीसाठी लागणारा खर्च महावितरणला करावे लागते. तसेच रोहित्र जागेवरून फिल्टर युनिटला दुरूस्तीसाठी आणने. व  तो दुरूस्त करण्यात आलेले रोहित्र  परत शेतात त्या जागेवर बसविण्यासाठी  ने आण करून बसविण्याचा खर्च महावितरणला करावे लागते. शिवाय कृषीपंपासाठी  वापरलेल्या विजेचे पैसे  वीज कंपन्यांना व वीज वहनाचा महापारेषण कंपनीला दरमहा अदा करावे लागते. म्हणून कृषीपंपासाठी वापरलेल्या विजेचे पैसे,  रोहित्र दुरूस्ती व ने आण करून बसविण्याचा खर्च अदा करणे आवश्यक आहे.
सन 2021— 2022 मधील कृषीपंपाची 5 बिले होतात. कृषी धोरणानुसार रोहित्रावरील दोन चालू वीज बिले 80 टक्के कृषी ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केल्यास रोहित्र दुरूस्त करून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.  रोहित्र नादुरूस्त अथवा जळाल्यास चालू दोन चालू कृषीपंपांची वीज बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

माहे नोव्हेंबरमध्ये 15 दिवसात भरणा केलेली रक्कम कोटी रूपयांमध्ये
परिमंडल      कृषी ग्राहक     भरणा केलेली रक्कम
औरंगाबाद     4620        2.72
लातूर         4981       2.72
नांदेड         4346       2.07
मराठवाडा     13947      7.51

             ”आपले रोहित्र, आपली जबाबदारी स्विकारावी”
कृषीपंप रोहित्रावर मंजुर भारापेक्षा जास्त क्षमतेने विजेचा वापर झाल्यास रोहित्र मोठया प्रमाणात जळतात. तसेच रोहित्रावर आकडे टाकून विजेचा वापर केल्यास ओव्हर लोडने रोहित्र जळतात. रोहित्र जळाल्यास रोहित्र दुरूस्त करून आणे पर्यंत पिकाचे पाण्याअभावी नुकसान होते. शिवाय रोहित्र दूरूस्तीचा भुर्दड महावितरणला सहन करावा लागतो. यासाठी शेतक—यांनी रोहित्राचे पालकत्व स्विकारून त्या रोहित्रावरील शेतक—यांनी मंजुर भारापेक्षा जास्त क्षमतेने वापर होवू देवू नये. ”आपले रोहित्र, आपली जबाबदारी स्विकारावी” असे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close